Kaas Pathar: कास पठारावर बहरणार फुलांचे गालिचे | Satara |Plateau of Flowers | flowers |Sakal Media

2021-08-25 489

Kaas Pathar: कास पठारावर फुलांचे गालिच्छे बहरणार | Satara |Plateau of Flowers | flowers |Sakal Media
कास (सातारा) (satara) : कोरोना संकटामुळे गतसाली बंद असलेले सातारा जिल्ह्याचे वैभव 'पुष्प पठार कास'चा अधिकृत हंगाम पंचवीस ऑगस्टपासून चालू होत असून हंगामाची पूर्वतयारी कास पठार कार्यकारी समितीमार्फत पूर्ण झालीय. कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन करणे अत्यावश्यक ठरणार असून यासंदर्भात समितीने आवश्यक तयारी केली आहे. यामध्ये सहा गावांतील साधारणपणे १४० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून नोंदणीकृत कर्मचाऱ्यांची ओळख परेड करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी सुलभपणा यावा आणि गोंधळ उडू नये, यासाठी वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत. (व्हिडिओ : सूर्यकांत पवार)
#Kaasplateau #PlateauofFlowers #Satara #Maharashtra